|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » जिओ 4-जी डाऊनलोड स्पीडमध्ये 20 महिन्यातही अव्वल

जिओ 4-जी डाऊनलोड स्पीडमध्ये 20 महिन्यातही अव्वल 

व्होडाफोन-आयडियापेक्षा तीनपट अधिक वरचढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दूरसंचार क्षेत्रात सध्या देशात एकाच नावाची गर्जना होत आहे. ती म्हणजे रिलायन्स जिओ होय. मागील काही दिवसांमध्ये जिओने नवनवीन योजना ग्राहकांसाठी आणल्या आहेत. त्यात जिओ 4-जी नेटवर्कचा विस्तार सर्वाधिक झाला आहे. त्यासोबतच नुकतीच गिगाफायबरचीही योजना ग्राहकांच्या भेटीला आणली असल्याने जिओची घौडदौड जोरदार सुरु असल्याचे दिसून येत आहे.

देशातील डाऊनलोडमध्ये कोणत्या दूरसंचार कंपनीचे स्पीड किती आहे यांची ऑगस्टमधील आकडेवारी सादर केली आहे. यात रलायन्स जिओने मागील 20 महिन्यांच्या प्रवासात 4-जी डाऊनलोड स्पीडमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे. तर स्पर्धेतील व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांच्या तुलनेत तीनपट अधिक आणि एअरटेल अडीचपट जादा वेगवान स्पीडची नोंद भारतीय दूरसंचार नियामक संस्था (ट्राय)च्या आकडेवारीत देण्यात आली आहे. 

रिलायन्स जिओचे स्पीड जुलैमध्ये 21 एमबीपीएसने वाढत 21.3 एमबीपीएसवर पोहोचले आहे. एअरटेलचे स्पीड यांच कालावधीत 8.8 ने घटत 8.2 एमबीपीएसवर स्थिरावले. ही सलग पाचव्या महिन्यात घट झाली आहे. व्होडाफोन आणि आयडियाचे आकडे वेगवेगळे सादर केले आहेत. त्यात आयडियाला ऑगस्टमध्ये 4 जी डाऊनलोड स्पीड 6.1 एमबीपीएस होते तर जुलैमहिन्यात हा आकडा 6.6 राहिला होता. मात्र व्होडाफोनचा आकडा 7.7 वर स्थिरावल्याचे दिसून आले.

अपलोडमध्ये व्होडाफोनची बाजी

4 जी नेटवर्क स्पीडमध्ये व्होडाफोनची अपलोडमध्ये 5.5 एमबीपीएससोबत पुढे राहिली आहे. यावेळी आयडिया 5.1 आणि एअरटेल यांचा वेग 3.1 वर राहिला आहे.

Related posts: