|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » हुवैईची किरिन 990 भारतात लवकरच

हुवैईची किरिन 990 भारतात लवकरच 

प्रतिनिधी / पुणे

हुवैई कन्झ्युमर बिझनेस समूहाने पहिली आणि सर्वसमावेशक फ्लॅगशीप 5 जी चिपसे, किरिन 990 मालिका लवकरच भारतात उपलब्ध करणार असल्याचे जाहीर केले आहे.

ही चिपसेट जगातील पहिली मोबाइल एसओसी असून 10.3 अब्ज ट्रान्सिस्टर्समुळे ती सर्वात कार्यक्षम, वेगवान आणि प्रभावी चिपसेट्सपैकी एक आहे. किरिन 990 मुळे स्मार्टफोन ग्राहकांना अधिक वेगवान आणि उर्जा कार्यक्षम 5 जी अनुभव घेता येणार आहे. 5 जी आवृत्ती भारतात आगामी हुवैई स्मार्टफोन्ससह उपलब्ध होणार आहे. हुवैई ब्रँडच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे देश व्यवस्थापक टोर्नाडो पॅन म्हणाले, भारत हा हुवैईच्या महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी एक असल्यामुळे ग्राहककेंद्री नाविन्य हे आमच्या येथील कामाच्या केंद्रस्थानी असते. आम्ही कायमच ग्राहकांना सर्वोत्तम ते देण्यावर विश्वास ठेवला आहे. किरिन 990 हे आजच्या स्मार्टफोन तंत्रज्ञानाचे शिखर असून, ते ग्राहकांना 5 जीच्या नव्या युगात घेऊन जाईल. चिपसेट लोकांच्या स्मार्टफोन वापरण्याच्या पद्धतीमध्ये क्रांती घडवून आणेल.

Related posts: