|Monday, December 16, 2019
You are here: Home » उद्योग » ऊर्जा-धातू निर्मितीच्या कामगिरीने बाजार तेजीत

ऊर्जा-धातू निर्मितीच्या कामगिरीने बाजार तेजीत 

सेन्सेक्स 83 अंकानी वधारला : आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम

वृत्तसंस्था / मुंबई

मुंबई शेअर बाजारात(बीएसई) सलग दोन दिवस आलेल्या घसरणीला ब्रेक तिसऱया सत्रात बुधवारी ब्रेक लागल्याचे पहावयास मिळाले आहे. दिवसभरातील व्यवहारात धातू निर्मिती, ऊर्जा आणि आंतरराष्ट्रीय स्तरांवर भडकलेल्या कच्च्या तेलाच्या किंमतीवर नियंत्रित करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामुळे बाजार काहीसा सावरला असल्याचे पहावयास मिळाले आहे.

बीएसई सेन्सेक्स दिवसअखेर 83 अंकानी वधारुन निर्देशांक 36,563.88 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 31.05 अंकानी तेजी नोंदवत 10,848.65 वर बंद झाला आहे. बुधवारी मुंबई शेअर बाजाराने केलेली कामगिरीने गुंतवणूकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. सौदीच्या अरामको या खनिज तेल शुद्धीकरण कंपनीवर ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यामुळे तेलशुद्धीकरण थांबविण्यात आले होते. त्याचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरांवर कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या होत्या त्यामुळे भारतासह अन्य शेअर बाजारात दबावाचे वातावरण निर्माण झाले होते.

दिग्गज कंपन्यांमध्ये टाटा स्टील, वेदान्ता, स्टेट बँक, टेक महिंद्रा, बजाज फायनान्स, एशियन पेन्टस, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, एनटीपीसी आणि पॉवरग्रिड यांचे समभाग 3.95 टक्क्यांनी तेजीत राहिले होते. याउलट ओएनजीसी, येस बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, सन फार्मा आणि मारुती सुझुकी यांचे समभाग मात्र 2.08 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.

आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम

मंगळवारी अमेरिकन रिझर्व्ह फेडरेशन बँकेची बैठक सुरु आहे. यामध्ये व्याजदर कपात करण्यावर चर्चा केली. यांचा प्रभाव गुंतवणूकदारांवर सकारात्मक झाल्याचे दिसून आले.

Related posts: