|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला

सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला 

सातारा जिह्यात दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

प्रतिनिधी/ सातारा

आठ दिवस थोडीसी उघडीप देवून दिलासा दिलेल्या पावसाने पुन्हा सातारा जिह्यात सायंकाळपासून आगमन केले. त्यामुळे जिह्यातील शेतकऱयांना उरलेली पिके वाया जाण्याची भिती व्यक्त केली आहे. दरम्यान, हवामान खात्याने दि. 20 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

सातारा जिह्याच्या पश्चिम भागात पावसाळा सुरु झाल्यापासून पावसाचा धबाबा सुरु आहे. कोयना धरण परिसरात तर पावसाची उघडीप झालेली नाही. 110 दिवस सतत पावसाची रिपरिप सुरु आहे. महाबळेश्वर, सातारा तालुक्याचा पश्चिम भाग, उरमोडी, तारळी धरण परिसरात पावसाची रिपरिप सुरु आहे, तर पूर्व भागात पावसाची पाठ फिरलेले चित्र आहे. गुरुवारी दुपारपासून पावसाने पुन्हा आगमन केले. या पावसामुळे बेसावध असलेल्याची चांगलीच पळापळ केली. शेतकऱयांनीही या पावसामुळे आलेली हातातोंडाची पिके वाया जाण्याची भिती व्यक्त केली आहे. दरम्यान, भुईमुग, भात ही पिकांनाही धोका पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने दि. 19 व 20 रोजी सातारा जिह्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.  

Related posts: