|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » उद्योग » मारुतीने विदेशात पाठवल्या 10 लाख कार

मारुतीने विदेशात पाठवल्या 10 लाख कार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली :

मारुती सुझुकी इंडियाने विदेशात 10 लाख कार्सची निर्यात केली आहे. ही निर्यात गुजरातमधील मुंद्रा बंदरातून करण्यात आली असून यामध्ये ऑक्सफोर्ड ब्लू रंगाची सेडान डिझायनरचा यात समावेश असल्याची माहिती कंपनीकडून गुरुवारी देण्यात आली आहे. 10 लाख कारची निर्यात मुंद्रा बंदरातून चिली येथे केली असून या बंदराचा अमेरिका, सुदूर पूर्वोत्तर आणि युरोपीय देशांना या मारुतीच्या कार प्रामुख्याने निर्यात करण्यात येतात.

निर्यात करताना कंपनी उपलब्ध कालावधीत कारची तपासणी करुन मुख्य 14 मॉडेलची निर्यात केली जाते. यामध्ये अल्टो-10, सेलेरिया, बलेनो, इग्निस आणि डिझानय यांचा समावेश केला आहे. कंपनी जवळपास 125 हून अधिक देशांमध्ये आपल्या प्रवासी कारची निर्यात करत असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

10 वर्षांपुर्वीच सुरुवात

गुजरात राज्यातील मुंद्राच्या बंदरातून निर्यात चालू करुन कंपनीला सध्या  10 वर्षांचा कालावधी पूर्ण झाला असल्याची माहिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी केनिची आयुकावा यांनी दिली आहे.

 

 

Related posts: