|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » उद्योग » स्मार्टफोन, टीव्हीवर बंपर सवलत

स्मार्टफोन, टीव्हीवर बंपर सवलत 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

दसरा-दिवाळीच्या काळात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ऍमेझॉन कंपनीने ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’चे आयोजन केले आहे. 29 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱया या सेलमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंवर मोठी सवलत मिळणार आहे. स्मार्टफोन, फॅशन, इलेक्ट्रॉनिक प्रॉडक्ट या वस्तूंवर ऑफर्स मिळणार आहेत. एसबीआयच्या डेबिट आणि पेडिट कार्डवर खरेदी केल्यास ग्राहकांना 10 टक्क्मयांपर्यंत सवलत मिळेल. कंपनीच्या ‘ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल’मध्ये स्मार्टफोनवर 40 टक्के सूट उपलब्ध असणार आहे. याचबरोबर, सेलमध्ये कॅशबॅक, एक्सचेंज ऑफर, नो-कॉस्ट इएमआय, फ्री रिप्लेसमेंट, एक्सचेंज ऑफर्स चाही समावेश आहे. या सेलमध्ये टीव्ही आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर 75 टक्के सूट मिळणार आहे. फ्री-डिलीव्हरीसोबत इन्स्टॉलेशनचीही सुविधा उपलब्ध असणार आहे. ऍमेझॉन सेलमध्ये 833 रुपये नो-कॉस्ट ईएमआयवर टीव्ही खरेदी करता येणार असून 695 रुपयांच्या नो-कॉस्ट इएमआयवर वॉशिंग मशीन खरेदी करण्याची संधी ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे.

 

Related posts: