|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » मनोरंजन » अजय पूरकर साकारणार सुभेदार तानाजी मालुसरे

अजय पूरकर साकारणार सुभेदार तानाजी मालुसरे 

ऑनलाईन टीम / पुणे :

असीम  निष्ठा आणि अतुलनीय शौर्याने मराठेशाहीच्या इतिहासात आपला अमीट ठसा उमटविणारे व्यक्तिमत्व म्हणजे….सुभेदार तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांच्या मौल्यवान सहकाऱयांपैकी एक म्हणजे तानाजी मालुसरे. या सुभेदार तानाजी मालुसरे यांची तडफदार व्यक्तिरेखा अभिनेता अजय पूरकर आगामी ‘फत्तेशिकस्त’ चित्रपटात रंगविणार आहेत. येत्या 15 नोव्हेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

भूमिकेतले वेगळेपण जपत रंगभूमी, चित्रपट, मालिकांमध्ये वैविध्यपूर्ण व्यक्तिरेखा साकारणारे अजय पूरकर यांच्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक होती. ‘फर्जद’ मधील ‘मोत्याजी मामा’ यांची भूमिका साकारल्यानंतर अत्यंत शूर आणि पराक्रमी अशा तानाजींच्या या भूमिकेसाठी वेगळेपण जपणे गरजेचे होते. आपल्या या भूमिकेबाबत बोलताना अजय सांगतात की, फर्जंद च्या यशानंतर प्रेक्षकांना आमच्याकडून मोठय़ा अपेक्षा आहेत. मी साकारत असलेली ‘तानाजी’ ही व्यक्तिरेखा महत्त्वपूर्ण असल्याने या व्यक्तिरेखेसाठी मी चांगलीच मेहनत घेतली आहे. विशेष म्हणजे हा वेगळेपणा जपण्यासाठी सिंहगडावरील तानाजीच्या पुतळय़ावरून प्रेरित होऊन माझी वेशभूषा करण्यात आली आहे. तसेच भूमिका अधिक चांगली वठण्यासाठी तलवारबाजी, घोडेस्वारी यासारखी अभ्यासपूर्ण तयारी मी केली आहे. ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी शब्दातून, अभिनायातून तसेच देहबोलीतून व्यक्त होणं गरजेच होतं त्यामुळे बारीक कंगोऱयांसह ही भूमिका उभी करण्याचा प्रयत्न मी केला आहे.

ए. ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रे÷ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत.

Related posts: