|Saturday, December 7, 2019
You are here: Home » Top News » साताऱयाची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर; उदयनराजेंना धक्का

साताऱयाची लोकसभा पोटनिवडणूक लांबणीवर; उदयनराजेंना धक्का 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज राज्यातील विधानसभा निवडणुकांची घोषणा केली. मात्र, विधानसभांबरोबर सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीबाबत कोणतीही भूमिका जाहीर न केल्याने साताऱयाचे राष्ट्रवादीचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांना चांगला धक्का बसला आहे.

काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजप प्रवेशापूर्वी त्यांनी विधानसभा निवडणुकांसोबत सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक घेण्याची अट भाजपला घातली होती. भाजपने त्यांची अट मान्य केल्यानंतरच उदयनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आज केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत महाराष्ट्र आणि हरियाणाच्या निवडणूकांची तारीख जाहीर केली. या दोन्ही राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. याचवेळी निवडणूक आयोगाकडून सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या घोषणेची अपेक्षा होती. मात्र, आयोगाने पोटनिवडणुकीबाबत कोणतीही घोषणा केली नाही. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक लांबणीवर पडली आहे.

दरम्यान, या विषयावर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, उदयनराजे विधानसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांचा प्रचार करतील. शिवसेना-भाजपचे संघटन मोठे आहे. नाराजी असेल, पण बंडखोरी होणार नसल्याचा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

Related posts: