|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » उत्तर प्रदेश : फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 6 ठार

उत्तर प्रदेश : फटाक्याच्या कारखान्यात स्फोट, 6 ठार 

ऑनलाइन टीम /एटा : 

उत्तर प्रदेशातील एटा जिह्यात आज, शनिवारी एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला या स्फोटात सहाजण ठार झाले आहेत. तर दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

एटा जिह्यातील मिरेहची येथे ही घटना घडली. दुपारी अचानक या कारखान्यात अचानक स्फोट झाला. स्फोट अत्यंत भीषण होता. स्फोटानंतर संपूर्ण कारखानाच जमीनदोस्त झाला. त्यामुळे या परिसरात एकच धवपळ उडाली. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या कर्मचाऱयांनी तात्काळ घटनास्थळी पोहचले असून युद्धपातळीवर रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे.

काही दिवसांपूर्वी पंजाबच्या बटाला येथेही एका फटाक्याच्या कारखान्यात स्फोट झाला होता. त्यात 23 कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता.

 

Related posts: