|Saturday, December 7, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात 10 लाखांचे कोकेन जप्त

पुण्यात 10 लाखांचे कोकेन जप्त 

पुणे / वार्ताहर : 

कोकेन विक्रीसाठी आलेल्या नायजेरियन तरुणाला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी तब्बल 10 लाख रुपयांचे 200 ग्रॅम कोकेन जप्त केले आहे. ही कारवाई कोंढव्यातील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर अमली पदार्थविरोधी पथकाने केली.

 उबा सव्हियर गोडविन (वय 31, रा. पिसोळी) असे या नायजेरियन तरुणाचे नाव आहे. अमली पदार्थविरोधी पथकातील पोलीस उपनिरीक्षक महाडिक व त्यांचे पथक  गस्त घालत होते. कोंढवा येथील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर एक नायजेरियन कोकेन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक महाडिक व त्यांच्या सहकाऱयांना मिळाली.

 मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी कोंढव्यातील ब्रम्हा अवेन्यू सोसायटीसमोर सापळा रचला. तेव्हा एक नायजेरियन तरुण आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतल्यावर त्याच्याकडे 200 ग्रॅम कोकेन, 1 लाख 84 हजार 190 रुपये रोख रक्कम, मोबाईल, मोटारसायकल असा एकूण 12 लाख 15 हजार 49 रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. ही कामगिरी पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Related posts: