|Sunday, December 15, 2019
You are here: Home » Top News » ‘गल्ली बॉय’ ऑस्कर शर्यतीत : ‘अपना ऑस्कर आयेगा’

‘गल्ली बॉय’ ऑस्कर शर्यतीत : ‘अपना ऑस्कर आयेगा’ 

ऑनलाइन टीम /नवी दिल्ली : 

अभिनेता रणवीर सिंग व अभिनेत्री आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला ‘गली बॉय’ या सिनेमाला भारताकडून 92व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’ या कॅटेगरीसाठी गली बॉयची भारताकडून निवड करण्यात आली आहे.

धारावीतील एका स्लम रॅपर्सच्या जीवनावर हा सिनेमा आधरित आहे. झोया अख्तरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये ‘गली बॉय’ला सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कार देण्यात आला आहे. तर दक्षिण कोरियातील 23 व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन सिनेमाचा पुरस्कारही ‘गली बॉय’ने पटकावला आहे.

‘गली बॉय’सह ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’, ‘केसरी’, ‘बधई हो’, ‘आर्टिकल 15’ आणि ‘अंधधून’ आदी चित्रपट ऑस्करवारीच्या स्पर्धेत होते. मात्र या सर्व सिनेमावर गली बॉयने मात केली आहे.

 

Related posts: