|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी : विविध कार्यक्रमांचे आयोजन

पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी : विविध कार्यक्रमांचे आयोजन 

पुणे /प्रतिनिधी : 

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासोबतच त्यांच्यासाठी विविध योजना राबविणाऱया पुणे माध्यमिक शिक्षक सहकारी पतपेढी मर्यादित संस्थेच्या 75 व्या म्हणजेच अमृत महोत्सवी वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अमृत महोत्सवी वर्षाचा उद्घाटन सोहळा सोमवारी 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजता घोले रस्त्यावरील पंडित जवाहरलाल नेहरु सांस्कृतिक भवन येथे होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीज्ञ ऍड.भास्करराव आव्हाड हे असणार आहेत. तसेच खासदार गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, सहकार तज्ञ डॉ.विद्याधर अनास्कर, संस्थेचे अध्यक्ष संजय सातपुते, उपाध्यक्ष विद्या पवार, मानद सचिव अंजली गोरे, खजिनदार सुभाष ससाणे यांसह संचालक व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

उद्घाटन सोहळय़ासोबतच पतशक्ती या अमृत महोत्सवानिमित्त काढलेल्या पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. तसेच गुणी पाल्य सत्कार व सभासदांच्या सन्मान सोहळय़ाचे देखील आयोजन करण्यात आले आहे.

 

Related posts: