|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 2 ऑक्टोबर रोजी काँग्रेसची पदयात्रा

2 ऑक्टोबर रोजी काँग्रेसची पदयात्रा 

सोनिया गांधी कार्यकर्त्यांना देणार शपथ

नवी दिल्ली :

2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त देशभरात होणाऱया पदयात्रांमध्ये काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधीही सामील होणार आहेत. ही पदयात्रा काँग्रेसच्या दिल्लीमधील कार्यालयाच्या ठिकाणी सकाळी 9 वाजता सुरू होणार आहे. 7000 जणांची ही मानवी साखळी 11 वाजता राजघाट येथे पोहोचणार आहे. सोनिया गांधी थेट 11 वाजता राजघाट येथे पोहोचतील.

सोनिया गांधी राजघाटावर पक्षाच्या कार्यकर्त्यांना शपथ घ्यायला लावणार आहेत. गांधींच्या आदेशांचे पालन अणि सांप्रदायिकतेशी लढण्याचा मुद्दा यात शपथेत सामील असणार आहे. सोनियांनी राज्य शाखा तसेच पक्ष पदाधिकाऱयांना 2 ऑक्टोबर रोजी एक तासाची पदयात्रा काढण्याचा निर्देश दिला आहे.

महात्मा गांधींची 150 वी जयंती व्यापक स्तरावर आयोजित करण्याची तयारी काँग्रेसने चालविली आहे. अध्यक्षांच्या निर्देशानुसार जिल्हा ते राज्य स्तरावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. तर भाजपही महात्मा गांधींचे विचार सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याच्या तयारीत आहे.

Related posts: