|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ‘गली बॉय’ चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन

‘गली बॉय’ चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

रणवीर सिंग यांची मुख्य भूमिका असलेला ‘गली बॉय’ हा चित्रपट भारताकडून 92 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी पाठविण्यात येणार आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फिचर फिल्म’साठी ‘गली बॉय’ चित्रपटाची भारताकडून निवड करण्यात आली आहे. या चित्रपटात रणवीर सिंग आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांनी कसदार अभिनय केलेला असून, अनेक पातळीवर हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. झोया अख्तर दिग्दर्शित ‘गली बॉय’ या चित्रपटात मुंबईतील झोपडपट्टीत लहानाचा मोठा झालेला आणि आपल्या स्वप्नांसाठी धडपडणाऱया 26 वषीय डिव्हाइन या प्रसिद्ध रॅपरची कथा दाखवण्यात आली आहे. या आधी मेलबर्नमध्ये पार पडलेल्या भारतीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये गली बॉयला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार देण्यात आला होता.  दक्षिण कोरियातील 23 व्या बुकियॉन इंटरनॅशनल फॅन्टॅस्टिक फिल्म फेस्टिव्हलमध्ये नेटवर्क फॉर द प्रमोशन ऑफ एशियन चित्रपटाचा पुरस्कारही ‘गली बॉय’ला मिळाला होता.

Related posts: