|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गुरुकूलच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरासाठी निवड

गुरुकूलच्या क्रिकेट संघाची जिल्हास्तरासाठी निवड 

सातारा तालुक्यावर अजिंक्यपद

प्रतिनिधी/ सातारा

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे शालेय स्तरावर घेण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलांच्या तालुकास्तरीय क्रिकेट स्पर्धेत येथील गुरुकूल विद्यालयाच्या क्रिकेट संघाने अजिंक्यपद पटकावत विजयाचा झेंडा रोवला. या संघाची शालेय जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवड झाली असून यामध्ये गुरुकूलच्या क्रिकेट संघाचा कर्णधार अद्वैत दीपक प्रभावळकर याने अष्टपैलू कामगिरी करत चमकदार कामगिरी केल्याने त्याचा गौरव करण्यात आला.

जिल्हा क्रीडा कार्यालयातर्फे घेण्यात आलेल्या 14 वर्षीय मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत सातारा तालुक्यातील शाळांनी सहभाग घेतला होता. यामध्ये गुरुकूल विद्यालयाच्या संघाने चमकदार कामगिरी करत अजिंक्यपदावर मोहर उमवटली. यामध्ये अद्वैत प्रभावळकर याने गोलंदाजी करताना दोन षटकात 6 धावा व 2 बळी अशी कामगिरी नोंदवली तर फलंदाजी करताना सेमी फायनलमध्ये सातारा इंग्लिश मेडयिम स्कूलच्या संघाविरोधात खेळताना त्याने नाबाद 32 धावांची खेळी केली. त्याच्या कामगिरीचा सैनिक स्कुलचे प्रमुख कर्नल रणजित नलावडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

गुरुकूलच्या संघात कर्णधार म्हणून अद्वैत प्रभावळकर याच्यासह जय फडतरे, सिद्धेश कोरे, हर्ष जाधव, पियुष फरांदे, तीर्थ तोडकर, अथर्व कांबळे, अथर्व निकम, यश केंजळे, अभिषेक रणदिवे, शिवम वैद्य, नील बहुलेकर, अक्षद थोरावडे, प्रेम पोफळे, अल्केष होरा या खेळाडूंचा सहभाग होता.

या संघाला कोच शेखर पवार, चीफ कोच मयूर कांबळे, स्पोर्ट इन्चार्ज राजेश निकम यांचे मार्गदर्शन लाभले, या यशाबद्दल संघातील खेळाडूंचे संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, सचिव आनंद गुरव, जनसंपर्क अधिकारी विश्वनाथ फरांदे व मुख्याध्यापिका शीला वेल्हाळ यांनी अभिनंदन केले.

Related posts: