|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » प्रवाशांशिवाय 46 विमानफेऱया

प्रवाशांशिवाय 46 विमानफेऱया 

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचा धक्कादायक प्रकार

  वृत्तसंस्था / इस्लामाबाद 

पाकिस्तानची सरकारी विमानोड्डाण कंपनी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने (पीआयए) 46 विमानफेऱया प्रवाशांशिवायच पूर्ण केल्या आहेत. या विमानफेऱयांमुळे कोटय़वधीचे नुकसान झाले असून लेखापरीक्षणात याचा खुलासा झाला आहे. विशेष म्हणजे इस्लामिक देशाच्या 36 विमानफेऱयांमधून हजयात्रेकरू प्रवास करणे अपेक्षित होते. पीआयएला पवित्र मक्का-मदिनासाठी हजयात्रेकरूही मिळाले नाहीत.

ही प्रकरणे केवळ 1 वर्षातील (2016-17) असून त्यांची चौकशी केली जात असल्याने आणखीन धक्कादायक गोष्टी समोर येऊ शकतात. पीआयएचे संचालन शासकीय निधीतून होते. एकूण 36 विदेशी विमानफेऱयांमध्ये कुठलाही प्रवासी नव्हता. प्रवासीरहित उड्डाणांमुळे पीआयएला 18 कोटी पाकिस्तानी रुपयांचा तोटा झाला आहे.

इस्लामाबादहून हज यात्रेसाठी याच कालावधीत विशेष विमानसेवा आयोजित करण्यात आल्या होत्या आणि यातील 36 फ्लाइट्सच रिकाम्याच गेल्या आहेत. तपासात अनेक विरोधाभास समोर आले आहेत. काही अहवालांनुसार प्रवासीरहित विमानफेऱयांबद्दल सरकारला कल्पना देण्यात आली होती, तरीही कारवाई करण्यात आलेली नाही. लेखापरीक्षण अहवालानंतर कारवाई केली जाणार असल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे.

Related posts: