|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » 11 अंकी मोबाईल क्रमांक व्यवस्था लवकरच

11 अंकी मोबाईल क्रमांक व्यवस्था लवकरच 

नवी दिल्ली

: दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) मोबाईल क्रमांक व्यवस्था बदलण्याचा विचार चालविला आहे. मोबाईल क्रमांकातील संख्या वाढविण्याचा निर्णय यात सामील असू शकतो. या निर्णयामुळे मोबाईल क्रमांक 10 ऐवजी 11 आकडी होणार आहे. दूरसंचार जोडण्यांची वाढती मागणी या निर्णयासाठी कारणीभूत आहे.

कोटय़वधी मोबाईल वापरकर्ते देशातील संपर्क क्रमाकांच्या वाढत्या गरजेसाठी जबाबदार आहेत. कंपन्यांना आता नवे मोबाईल क्रमांक हवे आहेत. ट्राय याकरता अनेक पर्याय पडताळून पाहणार आहे.

देशात 2050 पर्यंत विद्यमान क्रमांकांसह सुमारे 260 कोटी नव्या क्रमांकांची गरज भासणार आहे.

भारताने स्वतःची क्रमांक व्यवस्था आणि योजना यापूर्वी 1993 आणि 2003 मध्ये बदलली होती.  2003 मध्ये आणलेल्या क्रमांक व्यवस्थेने 75 कोटी नव्या दूरसंचार जोडण्यांसाठी जागा तयार झाली होती. केवळ मोबाईलच नव्हे तर फिक्स्ड लाईन क्रमांकही 10 अंकांवरून 11 अंकी केले जाऊ शकतात. तसेच डेटा ओनली मोबाईल नंबर्स (डोंगल कनेक्शनसाठी) 10 वरून 13 अंकी केले जाऊ शकतात. अशा क्रमांकांचा प्रारंभ 3, 5 आणि 6 ने होऊ शकतो.

Related posts: