|Sunday, January 26, 2020
You are here: Home » Top News » 93 वे अ.भा.साहित्य संमेलन : दिब्रिटो यांचे नाव आघाडीवर

93 वे अ.भा.साहित्य संमेलन : दिब्रिटो यांचे नाव आघाडीवर 

ऑनलाईन टीम / पुणे : 

उस्मानाबाद येथे होणाऱया 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्ये÷ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची आज निवड होण्याची शक्यता आहे.

संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीच्या रेसमध्ये दिब्रिटो यांचे नाव आघाडीवर आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची आज उस्मानाबादेत बैठक होणार आहे. त्यामध्ये दिब्रिटो यांची अध्यक्षपदी निवड होण्याची शक्मयता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

महामंडळाच्या बैठकीत अध्यक्ष निवडीबरोबरच संमेलनाच्या तारखा ही जाहीर होतील. दोन्ही ‘मसाप’कडून दिब्रिटो यांच्या नावाला पसंती आहे. मुंबई साहित्य संघाकडून ज्ये÷ कवी प्रवीण दवणे आणि विदर्भ साहित्य संघाकडून कथाकार भारत सासणे यांच्या नावाच्या प्रस्तावाची शक्मयता आहे. साहित्य महामंडळाच्या महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्था तसेच संलग्न आणि समाविष्ट संस्थांकडून दिब्रिटो यांच्या नावावर सहमती होण्याची शक्मयता आहे. पुण्यात मागील वषी झालेल्या साहित्यिक-कलावंत संमेलनाचे अध्यक्षपद दिब्रिटो यांनी भूषविले होते.

Related posts: