|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड

फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची संमेलनाध्यक्षपदी एकमताने निवड 

ऑनलाईन टीम / पुणे :

उस्मानाबाद येथे होणाऱया 93 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.

महामंडळाची आज औरंगाबाद येथे बैठक झाली. संमेलनाध्यक्षपदासाठी दिब्रिटो यांचे नाव सुरुवातीपासून आघाडीवर होते. अखेर आज झालेल्या महामंडळाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड करण्यात आली.

मराठी भाषिक ख्रिस्ती समाजाचे मुखपत्र असलेल्या ‘सुवार्ता’ या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम पाहिले. विविध विषयांवर लेखन करणारे दिब्रिटो यांना नुकताच ‘बायबल- दी न्यू टेस्टामेंट’ या पुस्तकाच्या त्यांनी मराठीत केलेल्या ‘सुबोध बायबल- नवा करार’ या पुस्तकासाठी साहित्य अकादमीचा 2013 या वषीचा राष्ट्रीय अनुवाद पुरस्कार जाहीर झाला आहे.

‘हरित वसई संरक्षण समिती’च्या माध्यमातून दिब्रिटो यांनी पर्यावरण जतन, संरक्षण आणि संवर्धनाची चळवळ उभी केली. पुणे येथे 1992 मध्ये झालेल्या पंधराव्या मराठी ख्रिस्ती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे.

Related posts: