|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » निवडणूक : पुणे शहरासह जिह्यात 10,700 पोलिसांचा बंदोबस्त

निवडणूक : पुणे शहरासह जिह्यात 10,700 पोलिसांचा बंदोबस्त 

ऑनलाईन टीम / पुणे :

विधानसभा निवडणुकीसाठी पुणे शहरासह जिह्यातील 21 विधानसभा मतदारसंघात दहा हजार सातशे पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या तयारीबाबत आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी ही माहिती दिली.

नवल किशोर राम म्हणाले, पोलीस प्रशासनाने मागील दोन महिन्यांपासून निवडणुकीसाठी तयारी केली आहे. निवडणुकीआधी शहरात 2 हजार 115 जणांवर, तर ग्रामीण भागात तब्बल साडेतीन हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु आहे. शहर पोलिसांकडून देण्यात आलेल्या शस्त्र परवाना धारकांकडून शस्त्रs जमा करण्याचे काम सुरु आहे. 6 हजार 548 जणांना हे परवाने देण्यात आले आहेत.

निवडणूक काळात अवैध पैसे, मद्य आणि शस्त्रे न येण्यासाठी जिह्यांच्या सीमांवर नाकाबंदी, वाहनांची तपासणी करण्यात येणार आहे. मतदानाच्या दिवशी आणि आधी होणाऱया गैरव्यवहारांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची गस्त वाढवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात तीन हजार 825 शस्त्र परवानाधारक असून, त्यांच्याकडून शस्त्रे जमा करण्यात येत आहेत. निवडणुकीसाठी एकूण 2 हजार 200 अधिकारी, कर्मचाऱयांसह नऊ निमलष्करी दलाच्या तुकडय़ांची कुमक असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

Related posts: