|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » पाक पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत ‘दुर्लक्षित’

पाक पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेत ‘दुर्लक्षित’ 

पाक मंत्री संतप्त : काश्मीर प्रकरणी अमेरिकेवर विश्वास नाही

वृत्तसंस्था/  वॉशिंग्टन

अमेरिकेत पोहोचल्यावर भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदींचे भव्य स्वागत झाले. तर पाक पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. सौदी अरेबियाच्या विमानाने न्यूयॉर्क येथे पोहोचलेल्या इम्रान यांच्या स्वागतासाठी विमानतळावर अमेरिकेचा कुठलाच वरिष्ठ अधिकारी उपस्थित नव्हता.  इम्रान यांच्यासाठी अंथरलेला लाल गालिचाही केवळ एक फूट लांबीचा असल्याने पाकिस्तानात संताप निर्माण झाला आहे.

अमेरिकेत मोदींचे जंगी स्वागत आणि इम्रान यांच्याकडे डोळेझाक झाल्याने पाकचे रेल्वेमंत्री भडकले आहेत. काश्मीर प्रकरणी अमेरिकेवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही. केवळ चीनच विश्वासू मित्र असल्याचे विधान रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी केले आहे.

पाकिस्तानीच करत आहेत थट्टा

पाकिस्तानचे लोकही आता इम्रान यांची थट्टा उडवू लागले आहेत. इम्रान यांचे अमेरिकेत विशाल रेड कार्पेट स्वागत झाले. अमेरिकेत मलीहा लोधी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित होत्या, असे उपरोधिक विधान एका पाकिस्तानीने ट्विटद्वारे केले आहे. मलीहा लोधी या संयुक्त राष्ट्रसंघात पाकिस्तानच्या प्रतिनिधी आहेत.

सौदीच्या विमानातून प्रवास

इम्रान खान हे सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांच्या विशेष विमानाने शनिवारी अमेरिकेत दाखल झाले होते. इम्रान यांना सौदी युवराजाने वाणिज्यिक विमानातून प्रवास करण्यापासून रोखले होते. पंतप्रधानाने दुसऱया देशाच्या सदस्याच्या खासगी विमानातून प्रवास करणे सार्वभौमत्वाची चेष्टा मानली जाऊ शकते.

Related posts: