|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » बुलढाणा : एकाच कुटुंबातील पाच जणींचे मृतदेह आढळले

बुलढाणा : एकाच कुटुंबातील पाच जणींचे मृतदेह आढळले 

 ऑनलाईन टीम / बुलढाणा :

बुलढाण्याच्या मेहकर तालुक्यातील माळेगावात एकाच कुटुंबातील 5 जणींचे मृतदेह विहरीत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यामध्ये आईसह चार मुलींचा समावेश आहे. या घटनेचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

उज्वला ढोके (35), मुलगी वैष्णवी ढोके (9), दुर्गा ढोके (7), आरुषी ढोके (4) आणि पल्लवी ढोके (01) अशी मृतांची नावे आहेत.

संबंधित घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह बाहेर काढले. दरम्यान, पोलिसांनी हे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. या घटनेतील पाच जणींची हत्या आहे की आत्महत्या याबाबतचा उलगडा शवविच्छेदन अहवालातून होईल, असे पोलिसांनी म्हटले आहे.

Related posts: