|Friday, December 6, 2019
You are here: Home » मनोरंजन » बिग बॉसचा 13 वा सिझन 29 सप्टेंबरपासून; ‘ही’ नावे चर्चेत

बिग बॉसचा 13 वा सिझन 29 सप्टेंबरपासून; ‘ही’ नावे चर्चेत 

ऑनलाईन टीम / मुंबई :

हिंदी बिग बॉसचा 13 वा सिझन येत्या 29 सप्टेंबरपासून मुंबईतील फिल्मसिटी येथे सुरु होत आहे. यंदाच्या 13 व्या सिझनमध्ये टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला, देबोलीना भट्टाचार्य, रश्मी देसाई, शिवीन नारंग, दलजीत कौर, आरती सिंह अशा सेलिब्रिटींची नावे चर्चेत आहेत.

हिंदी बिग बॉसच्या 13 व्या सिझनसाठी यापूर्वी लोणावळ्याची निवड करण्यात आली होती. मात्र, काही कारणास्तव हे शुटींग गोरेगाव येथील दादासाहेब फाळके फिल्मसिटीत घेण्याचे ठरले. या फिल्मसिटीत बिग बॉसचे 18,500 चौ. फुटांच्या जागेत घर तयार करण्यात आले आहे. या घराला म्युझियमचे रुप देण्यात आले आहे. या घरात 14 स्पर्धक 93 कॅमेऱयांच्या समोर 100 दिवस हा खेळ खेळणार आहेत. या शोचा होस्ट सलमान खान असणार आहे.

Related posts: