|Thursday, January 23, 2020
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचे अग्रस्थान कायम

ऑस्ट्रेलियाच्या बार्टीचे अग्रस्थान कायम 

झेकची प्लिसकोव्हा दुसऱया स्थानावर, सेरेनाची नवव्या स्थानी घसरण

वृत्तसंस्था/ पॅरिस

सोमवारी घोषित करण्यात आलेल्या डब्ल्युटीएच्या ताज्या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाच्या ऍश्ले बार्टीने आपले अग्रस्थान कायम राखले आहे. झेकची कॅरोलिना प्लिसकोव्हा दुसऱया स्थानी असून युक्रेनच्या स्विटोलिना तिसऱया स्थानी विराजमान आहे.

यंदाच्या वर्षी प्रेंच ओपन ग्रँडस्लॅम व बर्मिंगहॅम ओपन स्पर्धा जिंकत ऑस्ट्रेलियाच्या बार्टीने 6446 गुणासह अग्रस्थान कायम राखले आहे. आता, आजपासून सुरु होणाऱया वुहान ओपन स्पर्धेत चांगली कामगिरी करत अग्रस्थान आणखी भक्कम करण्याचा तिचा प्रयत्न असेल. या क्रमवारीत झेकची कॅरोलिना प्लिसकोव्हा 6125 गुणासह दुसऱया स्थानावर तर स्विटोलिना 5160 गुणासह तिसऱया स्थानी आहे. यंदाच्या वर्षी खराब फॉर्ममध्ये असलेल्या जपानच्या नाओमी ओसाकाची मात्र चौथ्या स्थानावर घसरण झाली आहे. अमेरिकन ओपन चॅम्पियन बियांका ऍड्रिस्क्यूने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. अमेरिकेची दिग्गज टेनिसपटू सेरेना विल्यम्स नवव्या स्थानी कायम असून रशियन टेनिस तारका मारिया शरापोव्हा 32 व्या स्थानावर आहे. याशिवाय, ब्रिटनची स्टार खेळाडू जोहाना कोंटा 11 व्या तर जर्मनीची केर्बर 12 व्या स्थानी विराजमान आहे.

महिला टेनिस क्रमवारी –

  1. ऍश्ले बार्टी (ऑस्ट्रेलिया) – 6,446 गुण
  2. प्लिसकोव्हा (झेक प्रजासत्ताक) – 6,125
  3. स्विटोलिना (युक्रेन) – 5,160
  4. नाओमी ओसाका (जपान) – 5,011
  5. बियांका (कॅनडा) – 4,835
  6. सिमोना हॅलेप (रोमानिया) – 4,803
  7. पेत्र क्विटोव्हा (झेक प्रजासत्ताक) – 4,326
  8. किकी बर्टन्स (हॉलंड) – 4,225
  9. सेरेना विल्यम्स (अमेरिका) – 3,935
  10. बेलिंडा बेन्सिक (स्वित्झर्लंड) – 3,738

 

पुरुषांच्या क्रमवारीत स्पेनचा राफेल नदाल अव्वलस्थानी

सोमवारी जाहीर करण्यात आलेल्या पुरुषांच्या ताज्या एटीपी क्रमवारीत स्पेनचा दिग्गज टेनिसपटू राफेल नदालने 9225 गुणासह अव्वलस्थान कायम राखले आहे. सर्बियाचा जोकोव्हिक दुसऱया स्थानी असून स्वित्झर्लंडचा फेडरर तिसऱया, रशियाचा मेदव्हेदेव्ह चौथ्या, डॉमनिक थिएम पाचव्या स्थानावर आहे. स्वीसचा युवा खेळाडू स्टॅन वावरिंकाची मात्र 15 व्या स्थानावर घसरण झाली आहे.

Related posts: