|Thursday, December 5, 2019
You are here: Home » क्रिडा » भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन

भारताचे माजी सलामीवीर माधव आपटे यांचे निधन 

प्रतिनिधी/ मुंबई

भारताचे माजी खेळाडू माधव आपटे (वय 87) यांचे सोमवारी निधन झाले. मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात त्यांनी सोमवारी पहाटे 6 वाजता अखेरचा श्वास घेतला आहे. क्रिकेटमधील चमकदार तारा काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे भारतीय क्रिकेट संघ, माजी क्रिकेटपटू तसेच माधव यांच्या चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.

माधव आपटे यांनी मुंबई संघातून पदार्पण करत रणजी सामन्यात सौराष्ट्रविरूद्ध शतक ठोकले होते. त्यानंतर 1952-1953 या काळात त्यांनी 7 कसोटी सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यावेळी पाकिस्तानविरूद्ध झालेल्या 2 कसोटी सामन्यासाठी माधव आपटे यांची भारतीय संघात निवड झाली. दरम्यान, माधव यांनी उत्तम खेळी केली होती. यामुळे माधव आपटे यांची वेस्ट इंडिज दौऱयासाठी निवड करण्यात आली होती. आपटे यांनी 5 सामन्यांच्या मालिकेत सलामीला खेळताना 1 शतक आणि अर्धशतकांसह 51.11 च्या सरासरीने 460 धावा केल्या होत्या. विंडीजच्या गोलदांजाची धुलाई करत माधव आपटे यांनी 163 धावांची धमाकेदार खेळी साकारली होती. याचबरोबर पॉली उम्रीगर यांच्यानंतर सर्वाधिक धावा करणारे ते दुसरे फलंदाज ठरले होते. या दौऱयानंतर त्यांना पुन्हा भारतीय संघात स्थान मिळाले नाही. आपटे यांनी प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 67 सामन्यात 3336 धावा केल्या असून यात 7 शतकांचा समावेश आहे.

माधव आपटे यांची गुरू अशीच ओळख निर्माण झाली होती. त्यांनी जात, धर्म, लिंग, गरीब-श्रीमंत या भेदांपलीकडे जाऊन अनेक खेळाडूंना मार्गदर्शन केले आहे. त्यांचा स्वभावही खिलाडूवृत्तीचा होता. त्यामुळे क्रिकेटपासून ते उद्योग क्षेत्रात त्यांचा मित्र परिवार होता. माधव आपटे एका खेळाडूबरोबर यशस्वी उद्योजक म्हणूनही ते परिचित होते.

 

Related posts: