|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » निवडणूक आयुक्तांच्या पत्नीवर प्राप्तिकर विभागाचा वॉच

निवडणूक आयुक्तांच्या पत्नीवर प्राप्तिकर विभागाचा वॉच 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

करचुकवेगिरीच्या आरोपाखाली देशाचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांच्या पत्नी नोवेल सिंघल लवासा यांच्यावर प्राप्तिकर विभागाची नजर असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नोवेल सिंघल लवासा यांच्यावर 2015 ते 2017 या काळातील कथित करचुकवेगिरीचा ठपका आहे. त्या 10 कंपन्यांच्या संचालक मंडळातील सदस्य संचालक आहेत. 2015 ते 2017 या काळात त्यांनी भरलेल्या कंपन्यांच्या प्राप्तिकर विवरणपत्रातील काही तपशीलासंदर्भात प्राप्तिकर विभागाने त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागविले आहे. तसेच त्यांच्या वैयक्तिक प्राप्तिकर विवरणपत्राबाबतही माहिती मागविली आहे.

Related posts: