|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘फत्तेशिकस्त’ मध्ये अंकित मोहन साकारणार ‘येसाजी कंक’

‘फत्तेशिकस्त’ मध्ये अंकित मोहन साकारणार ‘येसाजी कंक’ 

ऑनलाईन टीम / पुणे : 

दमदार अभिनय, भरदार शरीरयष्टी आणि जबरदस्त ऍक्शन स्टंट करणारा अभिनेता अंकित मोहन आगामी ‘फत्तेशिकस्त’ या चित्रपटात ‘येसाजी कंक’ यांची भूमिका साकारणार आहे.

‘येसाजी कंक’ यांना ‘शिवबाचा ढाण्या वाघ’ म्हणून ओळखले जाते. मदमस्त हत्तीला ही आपल्या शौर्याने काही क्षणांत लोळवणाऱया येसाजी कंक यांचे स्वराज्यनिर्मितीत बहुमूल्य योगदान राहिले असल्याची महती इतिहासात वर्णलेली आहे.

अंकितला ऍक्शनची प्रचंड आवड असल्याने चित्रपटातील ऍक्शन्स सीन स्वतः करण्यासाठी अंकित आग्रही होता. यातील एका सीनसाठी तर अंकितने चक्क दुसऱया मजल्यावरून उडी मारत तो सीन पूर्ण केला. त्याचा हा धाडसी शॉटस बघून सगळेजण थक्क झाले. आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना अंकित सांगतात, ‘कोंडाजी फर्जंद’च्या यशानंतर ‘येसाजी कंक’ यांची महत्त्वपूर्ण भूमिका साकारायला मिळणे हे माझ्यासाठी नक्कीच आनंददायी आहे. दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ करण्याचा प्रयत्न मी केला आहे. माझा हा प्रयत्न प्रेक्षकांनाही आवडेल, असा विश्वास अंकित व्यक्त करतो.

ए. ए फिल्म्सचे सहकार्य व आलमंड्स क्रिएशन्सची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन दिग्पाल लांजेकर यांनी केले आहे. अजय आरेकर व अनिरुद्ध आरेकर या चित्रपटाचे निर्माते आहेत. छायांकन रेशमी सरकार तर संकलन प्रमोद कहार यांचे आहे. संगीत-पार्श्वसंगीत देवदत्त मनिषा बाजी तर गीते संतश्रे÷ तुकाराम महाराज, वि.स खांडेकर, दिग्पाल लांजेकर यांची आहेत. येत्या 15 नोव्हेंबरला ‘फत्तेशिकस्त’ प्रदर्शित होणार आहे.

Related posts: