|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » नाशिकमध्ये शेतकऱयाचा एक लाख रुपयांचा कांदा चोरीला

नाशिकमध्ये शेतकऱयाचा एक लाख रुपयांचा कांदा चोरीला 

ऑनलाईन टीम / नाशिक :

राज्यात कांद्याचे दर गगणाला भिडले असतानाच नाशिकमध्ये एका शेतकऱयाचा एक लाख रुपयांचा कांदा चोरीला गेला आहे. याप्रकरणी कांदा उत्पादक शेतकऱयाने पोलिसात तक्रार दिली आहे.

राहुल बाजीराव पगार असे कांदा चोरीला गेलेल्या शेतकऱयाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कळवण तालुक्यातील कांदा उत्पादक पगार यांनी त्यांच्या गोदामात 117 पेट्समध्ये 25 टन कांदा साठवून ठेवला होता. या साठय़ामधील एक लाख रुपये किंमतीचा कांदा चोरीला गेला आहे. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

Related posts: