|Sunday, January 26, 2020
You are here: Home » उद्योग » 17 भारतीय कंपन्यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश

17 भारतीय कंपन्यांचा फोर्ब्सच्या यादीत समावेश 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

जगभरातील उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्यांचा फोर्ब्सकडून सन्मान करण्यात आला आहे. या यादीमध्ये भारतामधील जवळपास 17 कंपन्यांचा गौरव करण्यात आला आहे. इन्फोसिस, टीसीएस, आणि एचडीएफसी यांनी यात मोठी मजल मारली आहे. तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनी इन्फोसिसला  तिसऱया क्रमाकांचे स्थान मिळाले आहे.

जागतिक तंत्रज्ञान कंपनी वीजा फोर्ब्सच्या यादीत प्रथम स्थानी आणि इटलीची कार निर्मिती कंपनी फेरारी दुसऱया स्थानी राहिली आहे. इन्फोसिस 2018मध्ये याच यादीत 31 स्थानी राहिली होती. ही कामगिरी भारतासाठी तर नेटफ्लिक्स चौथ्या, पेपाल पाचव्या, मायक्रोसॉफ्ट सहाव्या, वाल्ट डिज्नी सातव्या आणि टोयोटा मोटरीने आठवे स्थान मिळवले असल्याची नोंद फोर्ब्सच्या यादीत केली आहे.

बॉक्स

जगातील 250 कंपन्यांचा फोर्ब्सने सन्मान केला आहे. यामध्ये 59 कंपन्यांसह अमेरिका सर्वोच्च राहिली आहे. त्यापाठोपाठ जपान, चीन आणि भारत या देशातील 82 कंपन्यांचा यादीत समावेश आहे. मागील वर्षात तीन देशातील 63 कंपन्याचा समावेश  होता.

पहिल्या 50 कंपन्या

कंपनी                 स्थान

इन्फोसिस…………… 03

टीसीएस…………….. 22

टाटा मोटर्स…………. 31

टाटा स्टील………… 105

लार्सन ऍण्ड टुबो….. 115

महिंद्रा ऍण्ड महिंद्रा. 117

एचडीएफसी………. 135

बजाज फिन्सर्व्ह…… 143

पिरामल एन्टरप्राइजेस 149

स्टील ऍथोरिटी ऑफ इंडिया          153

एचसीएल टेक…….. 155

हिडाल्को…………… 157

विप्रो……………………..   168

एचडीएफसी बँक…. 204

सन फार्मा…………. 217

जनरल इन्शुरन्स…… 224

आयटीसी………….. 231

एशियन पेन्ट्स        248

Related posts: