|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » तामिळनाडूच्या विजयात अभिनवची चमक

तामिळनाडूच्या विजयात अभिनवची चमक 

वृत्तसंस्था/ चेन्नाई

 विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेतील जयपूर येथे मंगळवारी झालेल्या सामन्यात अभिनव मुपुंदच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर तामीळनाडूने राजस्थानचा 6 गडय़ांनी पराभव केला. अभिनव मुपुंदने 75 चेंडूत 83 धावा जमविल्या.

गेल्यावर्षी या स्पर्धेत अभिनव मुकुंदने फलंदाजीत सातत्य राखताना 9 डावात 560 धावा जमविल्या होत्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 50 षटकांत 9 बाद 261 धावा जमविल्या. त्यानंतर तामीळनाडूने 48 षटकांत 4 बाद 262 धावा जमवित हा सामना 6 गडय़ांनी जिंकला.

राजस्थानच्या डावात अशोक मिनारियाने 1 षटकार आणि 1 चौकारांसह 35, अर्जित गुप्ताने 3 षटकार आणि 2 चौकारांसह 77 धावा जमविल्या. गुप्ता आणि मिनेरिया यांनी 5 गडय़ासाठी 87 धावांची भागिदारी केली. चहरने 25 चेंडूत जलद 48 धावा जमविल्या. तामीळनाडूतर्फे विघ्नेशने 34 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना तामीळनाडूच्या डावात सलामीच्या अभिनव मुकुंदने 75 चेंडूत 83 धावा झोडपताना अपराजितसमवेत दुसऱया गडय़ासाठी 114 धावांची भागिदारी केली. अपराजितने 2 चौकारांसह 52 धावा जमविल्या. कर्णधार दिनेश कार्तिकने 1 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 52 तर शाहरूख खानने 6 चौकारांसह नाबाद 48 धावा जमवित तामीळनाडूला 2 षटके बाकी ठेवून विजय मिळवून दिला.

संक्षिप्त धावफलक

राजस्थान 50 षटकांत 9 बाद 261 (गुप्ता 77, मिनेरिया 35, चहर 48, विग्नेश 3-34), तामीळनाडू 48 षटकांत 4 बाद 262 (अभिनव मुकुंद 75, अपराजित 52, दिनेश कार्तिक नाबाद 52, शाहरूख खान नाबाद 48).

Related posts: