|Saturday, February 29, 2020
You are here: Home » क्रिडा » भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य

भारताला एक सुवर्ण, दोन रौप्य 

आशियाई एज गुप चॅम्पियनशिप : रिले पथकात वीरधवल, श्रीहरी, आनंद, साजन यांचा समावेश

वृत्तसंस्था/ बेंगळूर

वीरधवल खाडे, श्रीहरी नटराज, आनंद अनिलकुमार, साजन प्रकाश या चौकडीने आशियाई एज गुप जलतरण चॅम्पियनशिपमध्ये पहिल्या दिवशी भारताचे पदकाचे खाते सुवर्णपदकाने खोलले असून त्यांनी 4ƒ100 मी. फ्रीस्टाईल रिलेमध्ये हे यश प्राप्त केले आहे. पहिल्या दिवशी आणखी दोन रौप्यपदकेही मिळविली.

भारतीय संघाने 3:23.72 सेकंद अवधी घेत पहिले स्थान मिळविले. इराणच्या संघाने 3:28.46 सेकंद वेळ नोंदवत रौप्य व उझ्बकेच्या पथकाने 3:30.59 से. वेळ घेत कांस्यपदक मिळविले. श्रीहरीने भारताला या रिलेची शानदार सुरुवात करून देताना पहिला टप्पा 50.68 सेकंदात पूर्ण केला तर इराणचा जलतरणपटू सिना घोलमपूरने 51.42 सेकंद वेळ घेतला. आनंदने ही मालिका पुढे चालू ठेवत दुसरा टप्पा 51.28 सेकंदात पूर्ण केला तर साजन प्रकाशने तिसऱया टप्प्यात 51.37 सेकंद वेळ नोंदवली. वीरधवलने शेवटचा टप्पा या तिघांपेक्षाही कमी वेळेत म्हणजे 50.39 सेकंदात पूर्ण करून भारताचे सुवर्ण निश्चित केले.

‘संघाला चांगली करून देणे महत्त्वाचे व निर्णायक ठरणारे असते. तशी सुरुवात झाल्यानंतर आमच्या सर्वच जलतरणपटूंनी जोरदार प्रयत्न करीत हे यश मिळविले. या स्पध्sा&त भारताला पहिले सुवर्ण मिळवून दिल्याचा आम्हा सर्वांनाच खूप आनंद झालाय,’ अशा भावना श्रीहरीने व्यक्त केल्या.

महिलांच्या 4ƒ100 मी. फ्रीस्टाईल रिले खुल्या स्पर्धेत भारताच्या ऋतुजा खाडे (59.83 से.), दिव्या सतिजा (1:01.61 से.), शिवानी कटारिया (59.57), माना पटेल (59.75) यांनी दुसरे स्थान मिळवित रौप्य मिळविले. त्यांनी एकूण 4:00.76 से. वेळ नोंदवली. या गटात थायलंडच्या पथकाने सुवर्ण (3:54.29 से.), हाँगकाँगने (4:08.64 से.) कांस्यपदक मिळविले. भारताला दुसरे रौप्य मिळाले ते 4ƒ100 मी. गट 2 मुलांच्या विभागात. वेदांत माधवन, उत्कर्ष पाटील, साहिल लश्कर व शोअन गांगुली यांनी 3:41.49 सेकंद अवधी घेत दुसरे स्थान मिळविले. जपानने सुवर्ण मिळविताना 3:34.60 सेकंदाचा नवा स्पर्धाविक्रम नोंदवला. चिनी तैपेईच्या पथकाने 3:42.29 से. अवधी घेत कांस्यपदक मिळविले.

Related posts: