|Sunday, December 15, 2019
You are here: Home » मनोरंजन » ‘आप्पा आणि बाप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

‘आप्पा आणि बाप्पा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित 

ऑनलाईन टीम / पुणे :

बुद्धीची देवता आणि प्रत्येकाचे विघ्न दूर करणारा हा ‘विघ्नहर्ता’ प्रत्येकाचा आवडता आहे. याच बाप्पाभोवती फिरणारी कथा आगामी ‘आप्पा आणि बाप्पा’ या चित्रपटातून आपल्यासमोर येणार आहे. या चित्रपटाचा गमतीशीर आणि तितकाच उत्साहवर्धक टेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. गरिमा प्रोडक्शन्स्ची प्रस्तुती असलेल्या ‘सन ऑफ सरदार’ व ‘अतिथी तुम कब जाओंगे’ या चित्रपटाच्या प्रस्तुतकर्त्याचा ‘आप्पा आणि बाप्पा’ हा पहिलाच मराठी चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

सभोवतालच्या परिस्थितीची जाण करवून देत हा ‘बाप्पा’, गोविंद कुलकर्णी म्हणजेच आप्पाच्या आयुष्यातील विघ्ने कशी दूर करणार? याची रंजक कथा या चित्रपटात मांडली आहे. सण आणि उत्सवासंबंधीची आजची वास्तविकता आणि त्यातून होणारी सर्वसामान्यांची कोंडी यावर मार्मिक पण तितकाच परखड प्रकाशझोत या चित्रपटातून टाकला आहे. याप्रसंगी उपस्थित प्रत्येक कलाकाराने गणपती बाप्पासोबतचे आपले नाते सांगताना आयुष्याच्या वाटेवर ‘दिशादर्शक’ ठरणारा हा ‘विघ्नहर्ता’ साद घालणाऱया प्रत्येक भक्ताच्या मदतीला धावून येतोच हे आवर्जून सांगितले. भरत जाधव, सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, संपदा कुलकर्णी, शिवानी रांगोळे, उमेश जगताप आदि कलाकार या चित्रपटात आहेत.

गरिमा धीर व जलज धीर या चित्रपटाचे निर्माते आहेत. अश्वनी धीर व अरविंद जगताप यांनी चित्रपटाचे लेखन केले आहे. छायाचित्रण सूर्या मिश्रा यांचे आहे. संगीताची जबाबदारी सारंग कुलकर्णी, सायली खरे, अभंग रीपोस्ट यांनी सांभाळली आहे.

Related posts: