|Saturday, March 28, 2020
You are here: Home » Top News » बँक घोटाळा : पवार साहेबांचा काहीही संबंध नाही : अजित पवार

बँक घोटाळा : पवार साहेबांचा काहीही संबंध नाही : अजित पवार 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

शिखर बँक प्रकरणाशी शरद पवार यांचा काहीही संबंध नाही. त्याप्रमाणे मी एका ही पैशाचा घोटाळा केलेला नाही. पवार साहेब कोणत्याही पदावर नसताना त्यांचं नाव यात आलं कसं हे समजू शकलं नाही. बारा ते तेरा हजार कोटींच्या ठेवी बँकेत असताना 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा होईल कसा? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित करत या प्रकरणी अजित पवार यांनी आपली बाजू मांडली आहे.

विधनसभा निवडणुकीच्या तोंडावरच शिखर बँक घोटाळा प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यासह जवळपास 70 जणांवर ईडीनं गुन्हे दाखल केले आहेत.

अजित पवार म्हणाले, बँकेत 25 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाला असेल किंवा अनियमितता झाली असेल तर, बँक अडीचशे ते तीनशे कोटींचा नफा कशी कमावते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. बँकेत घोटाळा झाला असता तर आतापर्यंत टाळं लावावं लागलं असतं, असंही ते म्हणाले.

 

Related posts: