|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » स्फोटके, बंदुका पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर

स्फोटके, बंदुका पुरवण्यासाठी पाकिस्तानकडून ड्रोनचा वापर 

अमृतसर / वृत्तसंस्था

गेल्या आठ दिवसांत पाकिस्तानमधून तब्बल 80 किलो दारूगोळा, एके-47 रायफल्स, बनावट नोटा आदी साहित्य जप्त करण्यात आलं आहे. पाकिस्तानमधून मालवाहू ड्रोनच्या मदतीने हा शस्त्रसाठा पुरवण्यात आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. केंद्रीय गुप्तचर यंत्रणांनीही यासंदर्भात सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले आहे. दरम्यान, या शस्त्रसाठय़ासंबंधी पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून तपासाची मागणी केली आहे.

गेल्या महिनाभरापासून पाकिस्तानकडून काश्मीर खोऱयात हिंसाचाराला चिथावणी देण्याचे प्रयत्न होत असतानाच पंजाबमध्ये पाक सीमेलगत असलेल्या तरनतारण आणि अमृतसर जिल्हय़ांमध्ये बनावट चलनासह प्रचंड शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. 9 ते 16  सप्टेंबर करण्यात आलेल्या कारवाईत 80 किलो दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.  यात पाच एके-47 बंदूक, 16 दारूगोळे, नऊ हातबॉम्ब, पाच सॅटेलाईट फोन, दोन मोबाईल, दहा लाख किंमत असलेले बनावट चलनी नोटा आदीचा समावेश आहे. पाकिस्तानच्या आयएसआयशी संबंधित खलिस्तान जिंदाबाद गटाचा या कटकारस्थानात सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ड्रोनच्या मदतीने हे साहित्य पाकिस्तानातून पाठवण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे.

Related posts: