|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » योगेश्वर दत्त, संदीप सिंग यांचा भाजपप्रवेश

योगेश्वर दत्त, संदीप सिंग यांचा भाजपप्रवेश 

नवी दिल्ली  / वृत्तसंस्था :

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या घोषणेनंतर भाजपने मोठे यश प्राप्त केले आहे. आंतरराष्ट्रीय कुस्तिपटू आणि ऑलिम्पिक पदक विजेते योगेश्वर दत्त तसेच भारतीय हॉकी संघाचे माजी कर्णधार संदीप सिंग यांनी गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. हरियाणा भाजप अध्यक्ष सुभाष बराला यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व प्रदान केले आहे. हरियाणातील शिरोमणी अकाली दलाचे आमदार बलकौर सिंग यांनीही गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

योगेश्वर दत्त आणि संदीप सिंग हरियाणातील विधानसभा निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. भाजपने देशाला नवी दिशा दिला आहे. भाजपची धोरणे तसेच कार्यामुळे प्रभावित होत पक्षप्रवेश करत आहोत. पक्षाच्या आदेशानुसार काम करणार असल्याचे दोन्ही क्रीडापटूंनी म्हटले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष सुभाष बराला यांनी दोन्ही क्रीडापटूंचे पक्षात स्वागत केले आहे. योगेश्वर दत्त आणि संदीप सिंग यांच्या प्रवेशामुळे भाजपचे बळ वाढणार आहे. दोघेही तरुणाईचे आदर्श असून तरुण-तरुणींना संधी देण्यासाठी पक्ष तत्पर असल्याचे बराला यांनी म्हटले आहे.

योगेश्वर यांनी बुधवारी नवी दिल्ली येथे बराला यांची भेट घेतली होती. तत्पूर्वी त्यांनी हरियाणा पोलीस दलातील नोकरीचा राजीनामा दिला होता. तसेच योगेश्वर यांनी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची मंगळवारी भेट घेतली होती. योगेश्वर हे सोनिपतच्या गन्नौर किंवा बडौदा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतील असे मानले जात आहे. तर संदीप सिंग हे कुरुक्षेत्र किंवा अंबाला जिल्हय़ातील एखाद्या मतदारसंघाचे उमेदवार असू शकतात.

Related posts: