|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » नासाने प्रसिद्ध केला विक्रमच्या लँडिंग साइटचा फोटो

नासाने प्रसिद्ध केला विक्रमच्या लँडिंग साइटचा फोटो 

ऑनलाइन टीम / वॉशिंग्टन : 

अमेरिकेच्या अंतराळ संस्था ‘नासा’ ने ‘चांद्रयान-2’ मोहिमेतील विक्रम लँडरची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत. ‘विक्रम’ लँडर चंद्रावर उतरताना जोरात आदळले असे नासाने या छायाचित्रांच्या आधारे स्पष्ट केले आहे. नासाने प्रसिद्ध केलेली ही हाय रेझोल्यूशन छायाचित्रे ऑर्बिटरद्वारे खेचलेली आहेत. म्हणजेच विक्रम चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर वेगाने खाली आला. विक्रमचं कोणतंही चित्र नासाने अद्याप जाहीर केलेलं नाही. पण त्याने असं आश्वासन दिलं आहे की, ऑक्टोबरमध्ये तो आणखी काही छायाचित्रे प्रसिद्ध करू शकेल. नासाची उच्च रिझोल्यूशन प्रतिमा त्याच्या चंद्र ऑर्बिटर कॅमेऱयाद्वारे कॅप्चर केली गेली आहे. ही छायाचित्रे 150 किमी इतक्या अंतरावरून काढण्यात आली आहे.

नासाच्या म्हणण्यानुसार, लूनर ऑर्बिटर 17 सप्टेंबरला लँडिंग साइटवरून गेला आणि त्याने बरीच छायाचित्रे काढली. पण, छायाचित्रांमध्ये लँडर विक्रम कुठेही दिसला नाही. नासाने म्हटलं की, ज्या वेळी ऑर्बिटर कक्षेत फिरत होता त्यावेळी तिथे संध्याकाळ होती. त्यामुळे त्याने काढलेले फोटो धुसर आहेत. त्यावेळी लँडर विक्रम सावलीत लपला असावा. ऑक्टोबरमध्ये चंद्रावर उजेड होईल, त्यानंतर विक्रमला शोधता येईल, असं नासाचं म्हणणं आहे.

 

Related posts: