|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » भूतान : लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलट शहीद

भूतान : लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर कोसळले, दोन पायलट शहीद 

ऑनलाइन टीम / थिम्पू : 

भारतीय लष्कराचे ‘चीता’ हे हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळले. या झालेल्या दुर्घटनेत दोन पायलट शहीद झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आज, शुक्रवारी दुपारी 1 वाजता भूतानच्या योंगफुला येथे ही घटना घडली.

आर्मीचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद म्हणाले, लष्कराच्या टेनिंग टीमचं हे हेलिकॉप्टर होते. अरुणाचल प्रदेशाच्या खिरमू येथून योंगफुलाकडे जात असताना हे विमान कोसळलं. त्यात दोन पायलट शहीद झाले. यातील एक पायलट लेफ्टिनेंट कर्नल अधिकारी होता, तर दुसरा भूतान येथिल पायलट होता. तो भारतीय सेनेत प्रशिक्षण घेत होता. विमान आणि हेलिकॉप्टर कोसळण्याची देशातील ही या वर्षातली 11 वी घटना आहे.

 

Related posts: