|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आता 48 वर

डेंग्यूच्या रुग्णांची संख्या आता 48 वर 

प्रतिनिधी/ सोलापूर

सोलापूर शहरात जानेवारी ते 27 सप्टेंबरपर्यंत डेंग्यूचे 511 रूग्ण संशयित आढळले आहेत. तर डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 42वरुन आता 48 वर गेली असल्याची माहिती महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी सांगितले.

 सध्याच्या वातावरणामुळे शहरात डेंग्यूची लक्षणे असलेले रूग्ण आढळून येत आहेत. तरी डेंग्यूची लक्षणे असलेल्या नागरिकांनी महापालिकेच्या दवाखान्यामध्ये तपासणी केली असता, 511 जण रूग्ण संशयीत असल्याचे आढळून आले. तर 48 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या रूग्णांवर सिव्हील हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. उपचारानंतर सर्व रूग्ण सुखरूप घरी परतले असून एकही रूग्ण अद्याप पर्यंत दगावला नाही.

महापालिकेकडून प्रतिबंधक उपाययोजना

सध्याच्या वातावरणामुळे डेंग्यूचे रूग्ण मोठय़ा प्रमाणात आढळत आहेत. याला अटकाव घालण्यासाठी सोलापूर महापालिकेकडून शहरातील विविध भागात धुरावणी, फवारणी करण्यात येत आहे. तसेच महापालिकेच्या सर्व दवाखान्यामध्ये डेंग्यूच्या उपचारासाठी आवश्यक असलेले व्हॅक्सीन, कॅप्सुल, लस मोठय़ा प्रमाणात उपलब्ध करून ठेवले आहेत.

-डॉ. संतोष नवले, आरोग्याधिकारी, महापालिका

Related posts: