|Friday, October 18, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मेष

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. नवरात्र उत्सवात काही घटना मनाप्रमाणे घडण्यास सुरुवात होईल. नोकरीत वरि÷ांच्या विरोधात जाऊ नका. धंद्यात मेहनत घ्यावीच लागेल. नवीन काम मिळवता येईल. राजकीय- सामाजिक कार्यात अत्यंत नम्रपणे कामे करा. सहनशीलतेचा अंत पाहिला जाईल. पण नाईलाज असेल. प्रेमानेच घरातील प्रश्न सोडवा. कला, क्रीडा, शिक्षणात कष्ट घ्या. आळस नको. वडिलधाऱयांची काळजी घ्या. स्वत:ची प्रकृती सांभाळा.


वृषभ

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. नोकरीत तुमचे  वर्चस्व राहील. महत्त्वाची कामे करून घ्या. धंद्यात समस्या निर्माण होण्याची शक्मयता शुक्रवार, शनिवारी आहे. घरातील जबाबदारी घ्यावी लागेल. मुलांनी लपवाछपवी करून मोठय़ा व्यक्तींना फसवू नये. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांच्या मागे लागून कामे करून घ्या. खाण्या-पिण्याची चंगळ सावधपणे करा. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती करता येईल.


मिथुन

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहे. श्री भगवती मातेच्या कृपेने चांगल्या घटना घडतील. धंद्यात प्रगती होईल. मोठे काम मिळेल. नोकरीत कामाचा व्याप असेल. बुधवार, गुरुवार वादविवाद होण्याची शक्मयता आहे. प्रवासात सावध रहा. दुखापत होऊ शकते. घरगुती कामे होतील. राजकीय, सामाजिक कार्यास, दौऱयात यश मिळेल. वरि÷ांचा दबाव राहील. साहित्य, कला, क्रीडा क्षेत्रात नवी संधी मिळू शकेल.


कर्क

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. धंद्यात चर्चा करतांना गुंता करू नका. सौम्य धोरण ठेवा. नोकरांना सांभाळून ठेवा. घरातील कामे वाढतील. जीवनसाथी, मुले यांच्यात मतभेद होतील. जमिनी संबंधी कामे करून घ्या. कोर्टकेस संपवण्याचा प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात मागे राहू नका, कामे करा.  अरेरावीने नाव बिघडेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल.


सिंह

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. प्रत्येक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. कोणतेही कठीण काम करून घ्या. धंद्यात वाढ करता येईल. थकबाकी मिळवा. नोकरीत जम बसेल. राजकीय, सामाजिक कार्यात लोकप्रियता मिळेल. लोकांचा विश्वास  संपादन करता येईल. जमीन, घर यासंबंधी कामे मार्गी लावता येतील. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. घरातील वाद मिटवण्यात यश येईल.


कन्या

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. तुमच्या प्रत्येक कामात नीट लक्ष द्या व कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात सुधारणा होईल. फायदा होईल. शेअर्समध्ये लाभ होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा मिळेल. लोकांची कामे करूनच तुम्ही मोठे व्हाल. घरातील कामे होतील. कला, क्रीडा, शिक्षणात चमकाल. कठीण काम करून घ्या. कोर्टकेस जिंकाल.


तुळ

तुमच्याच राशीत बुध,शुक्र प्रवेश करीत आहेत. रविवार कटकटीचा वाटेल. घाई करू नका. दुखापत संभवते. कोणताही वाद न वाढवता प्रश्न सोडवा. संयमाने सर्व साध्य होऊ शकेल. धंद्यात कामे येतील. नोकर मिळेल. घरातील  समस्या सुटण्यास सुरुवात होईल. नोकरीच्या ठिकाणी कामात लक्ष द्या. राजकीय, सामाजिक कार्यात वरि÷ांच्या मनाचा कल पाहून बोला. कला, क्रीडा, शिक्षणात आळस नको. वाहन जपून चालवा.


वृश्चिक

 तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. सोमवार, मंगळवार चिडेचडेपणा वाढू शकतो. कामाचा व्याप वाढेल. नोकरीत प्रगती होईल. धंद्यात नीट लक्ष द्या. शेअर्सचा अंदाज चुकेल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाची कामे करून घ्या. खंबीरपणे प्रश्नाला सामोरे जाता येईल. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल. प्रकृतीची काळजी घ्या.


धनु

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. साडेसाती सुरू आहे. सप्ताहाच्या मध्यावर किरकोळ अडचण येईल. धंद्यात वाढ करता येईल. थकबाकी मिळवा. घरातील कामे करता येतील. नवीन ओळखी वाढतील. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. कला, क्रीडा, शिक्षणात  प्रयत्नांना यश मिळेल. घरात आनंद राहील.


मकर

मकर राशीला साडेसाती सुरू आहे. तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. धंद्यात काम मिळेल. चर्चा सफल होईल. मोठे कंत्राट मिळवा. राजकीय, सामाजिक ठिकाणी तुम्ही योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. महत्त्वाची कामे करून घ्या. कोर्टकेस संबंधी समस्या कमी करा. घरातील कामे होतील. घर, जमीन यांची कामे रेंगाळत ठेवू नका. कला,क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल.


कुंभ

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. रविवारी राग वाढेल. प्रवासात घाई करू नका. कोणतेही काम करतांना उतावळेपणा करून चालणार नाही. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होईल. तुमच्याबरोबर स्पर्धा होईल. धंद्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. मागील येणे वसूल करा. कला, क्रीडा, शिक्षणात मेहनत घ्या, तरच यश मिळेल.


मीन

तुला राशीत बुध, शुक्र प्रवेश करीत आहेत. धंद्यात काम मिळवतांना बुद्धी व युक्ती वापरा. नोकरांच्या बरोबर वाद वाढवू नका. थकबाकी वसूल करा. घर, जमीन यासंबंधी समस्या सोडवा. राजकीय, सामाजिक कार्यात योजनांच्या मागे लागा. वरि÷ांना खूष करता येईल. घरातील वाद वाढू शकतो. स्वत:च्या खाण्याची काळजी घ्या. खिसा, पाकीट सांभाळा. कला, क्रीडा, शिक्षणात प्रगती होईल.