|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » ‘भारत की लक्ष्मी’ अभियान राबवा : नरेंद्र मोदी

‘भारत की लक्ष्मी’ अभियान राबवा : नरेंद्र मोदी 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमात देशवासियांना संबोधित केले. मुलींचा सन्मान करण्यासाठी ‘सेल्फी विथ डॉटर’ च्या धर्तीवर ‘भारत की लक्ष्मी’ अभियान चालवण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले आहे.

मोदी सरकारच्या दुसऱया कार्यकाळातील हा चौथा ‘मन की बात’ कार्यक्रम होता. मोदींनी कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी लता मंगेशकर यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मोदी म्हणाले, आपल्या देशात मुलींना लक्ष्मी मानले जाते. देशातील मुली आपल्या कौशल्याने देशाचे नाव प्रगतीपथावर नेत आहेत. त्यामुळे येणाऱया दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देशवासीय ‘भारत की लक्ष्मी’ असा हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर फोटो अपलोड करून मुलींचा सन्मान करू शकता, असेही मोदी म्हणाले.

तसेच तरुणांमध्ये वाढत असलेली व्यसनाधीनता कमी करण्यासाठी त्यांनी तरुणांना ई-सिगारेट सोडण्याचे आवाहन केले आहे. ई-सिगारेटही सिगारेट, तंबाखू एवढीच धोकादायक असते. तंबाखूमुळे कर्करोग आणि हदयावरोग होण्याची शक्यता असते.

Related posts: