|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मागितली माफी

ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मागितली माफी 

लंडन

 ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांची संसदेच्या स्थगितीप्रकरणी माफी मागितली आहे. मागील आठवडयात ब्रिटनच्या सर्वोच्च न्यायालयानेही पंतप्रधान बोरिस यांच्या निर्णयाला रद्दबातल ठरविले आहे. जॉन्सन यांनी महाराणींना फोन करून माफी मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधानांच्या निर्णयाला घटनाविरोधी ठरविले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर पंतप्रधान आणि महाराणी यांच्यातील विश्वासावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिले आहे. माजी पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्याप्रमाणेच बोरिस यांनीही विश्वास गमाविल्याचा दावा रॉयल पॅलेसच्या एका सूत्राने केला आहे. कॅमेरून यांनी महाराणींसोबत झालेली चर्चा उघड केल्याचा आरोप डेव्हिड यांच्यावर होता.

जॉन्सन यांनी 5 महिन्यांसाठी संसदेचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला विरोधी पक्षांच्या नेत्यांसह स्वपक्षातील काही नेत्यांनीही विरोध दर्शविला होता. या झटक्यानंतर जॉन्सन स्वतःची भूमिका योग्य असल्याचा दाखवून देण्याच्या प्रयत्नात असून बेक्झिटसाठी प्रतिबद्धता दर्शवत आहेत.

ब्रुसेल्ससोबत करारासह किंवा कराराशिवाय ब्रिटनला पुढील महिन्यात युरोपीय महासंघातून बाहेर काढू असा पुनरुच्चार ब्रिटनच्या पंतप्रधानांनी केला आहे. जॉन्सन यांनी रविवारी स्वतःच्या कॉन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या खासदारांना एकत्र केले आहे. निवडणूक पूर्वीचे पक्षाचे हे अंतिम संमेलन ठरू शकते. 31 ऑक्टोबरपर्यंत बेक्झिट प्रक्रिया पूर्ण करायची असल्याचे जॉन्सन यांनी म्हटले आहे.

ब्रेक्झिट प्रकरणी जॉन्सन यांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांना हाउस ऑफ कॉमन्समध्ये अडचणीत आणले आहे. जॉन्सन यांनी स्वतःचे अनेक खासदार गमावले आहेत. लंडनच्या क्वीन मेरी युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक टिम बेल यांच्यानुसार हे संमेलन जॉन्सन आणि बेक्झिटसाठी एक सभा ठरणार आहे.

संसदेला स्थगिती देणाऱया जॉन्सन यांच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी रद्दबातल ठरविले होते. हाउस ऑफ कॉमन्सला संबोधित करण्याची जॉन्सन यांची योजना आहे. पंतप्रधान पदावरील दोन महिन्यांचा जॉन्सन यांचा कार्यकाळ आव्हानात्मक राहिला आहे. कनिष्ठ सभागृहात त्यांना सातवेळा पराभव पत्करावा लागला आहे.

Related posts: