|Friday, February 28, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » भीषण बस अपघातात चीनमध्ये 36 ठार

भीषण बस अपघातात चीनमध्ये 36 ठार 

बीजिंग  / वृत्तसंस्था

चीनच्या पूर्व झिआंगसू प्रांतातील भीषण रस्ते दुर्घटनेत 36 जणांना जीव गमवावा लागला असून 36 जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकशी टक्कर झाल्याने प्रवाशांनी भरलेली बस उलटली आहे. या बसमधून 69 जण प्रवास करत होते. बसचा एक टायर पंक्चर झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. जखमींपैकी 9 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. दुर्घटनेनंतर एक्स्प्रेसवे काही काळासाठी बंद करण्यात आला होता.

दुर्घटनेची माहिती कळताच बचाव तसेच मदतकार्यास प्रारंभ करण्यात आला. 8 तासापर्यंत चाललेल्या बचावकार्यानंतर चांगचुन-शिन्जेन एक्स्प्रेसवे वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला आहे. चीनमध्ये रस्ते दुर्घटनांचे प्रमाण भयावह आहे. अत्याधिक वेग आणि वाहतूक नियमांचे पालन होत नसल्याने अशाप्रकारच्या भीषण दुर्घटना घडत असतात. 2015 मध्ये चीनमध्ये झालेल्या रस्ते दुर्घटनांमध्ये 58 हजार जणांचा बळी गेला होता. यातील 90 टक्के दुर्घटना वाहतूक नियमांच्या उल्लंघनांमुळे घडल्या होत्या.

 

Related posts: