|Saturday, January 25, 2020
You are here: Home » क्रिडा » पारस खाडकाचा टी-20 मध्ये विश्वविक्रम

पारस खाडकाचा टी-20 मध्ये विश्वविक्रम 

वृत्तसंस्था/ सिंगापूर

नेपाळ क्रिकेट संघातील फलंदाज पारस खाडकाने येथे झालेल्या नेपाळ आणि सिंगापूर यांच्यातील शनिवारच्या टी-20 सामन्यात नाबाद 106 धावांची विश्वविक्रमी खेळी केली. नेपाळकडून टी-20 प्रकारात शतक झळकवणारा खाडका हा पहिला फलंदाज आहे.

टी-20 या क्रिकेटच्या प्रकारामध्ये नेपाळचे नेतृत्व करणारा खाडका हा शतक झळकवणारा पहिला फलंदाज आहे. नेपाळने हा सामना 24 चेंडू बाकी ठेवून 9 गडय़ांनी जिंकला. 31 वषीय खाडकाने 52 चेंडूत 9 षटकार आणि 7 चौकारांसह नाबाद 106 धावा झोडपल्या. खाडकाने केवळ 49 चेंडूत आपले शतक पूर्ण केले. टी-20 प्रकारात जलद शतक झळकवणारा आशिया खंडातील खाडका हा चौथा फलंदाज आहे. या सामन्यात सिंगापूरने नेपाळला विजयासाठी 152 धावांचे आव्हान दिले होते. खाडका आणि अरिफ शेख या जोडीने 145 धावांची दुसऱया गडय़ासाठी भागीदारी केली. शेखने 38 चेंडूत 39 धावा जमविल्या.

या सामन्यात सिंगापूरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सिंगापूरचा कर्णधार टीम डेव्हिडने नाबाद 64 धावा जमविल्या. नेपाळचा फिरकी गोलंदाज एल. संदीपने आपल्या 4 षटकात केवळ 18 धावा दिल्या. के. सी. करनने 34 धावात 2 गडी तर सुशांत भारीने 1 गडी बाद केला.

Related posts: