|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शहरमध्यमधून पुन्हा प्रणितीताईचं, दक्षिणमधून बाबा मिस्त्राr

शहरमध्यमधून पुन्हा प्रणितीताईचं, दक्षिणमधून बाबा मिस्त्राr 

– काँग्रेस पक्षाकडून राज्यातील 51 उमेदवारांची यादी जाहीर

प्रतिनिधी/ सोलापूर

आगामी विधानसभेच्या निवडणूकीसाठी एमआयएम पाठोपाठ काँग्रेसनेही आपले उमेदवार जाहीर केले आहे. यात राज्यातील 51 उमेदवारांचा समावेश असून , सोलापूर शहरमध्यमधून पुन्हा एकदा प्रणिती शिंदे तर दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून नगरसेवक मौलाली सय्यद उर्फ बाबा मिस्त्राr यांच्या गळ्यात  उमेदवारीची माळ काँग्रेसने टाकली आहे.

   काँग्रेसच्या पडझडीच्या काळात आजपर्यंत सत्ता उपभोगलेले सगळेच मातब्बर भाजपा व सेनेच्या गळाला लागले. मात्र आमदार प्रणिती शिंदे या पक्षनिष्ठा पाळत काँग्रेसच्या बाजूने राहिल्या. लोकसभा निवडणुकीपासून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपने पक्षासाठी पायघडय़ा घातल्या होत्या. मात्र त्यांनी ही ऑफर धुडकावली होती. यामुळे काँग्रेसने उमेदवारांच्या पहिल्या यादीतच आमदार प्रणिती शिंदे यांच्या नावाचा समावेश केला आहे. दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात एकवेळ आमदार म्हणून नेतृत्व केलेले माजी आमदार दिलीप माने शिवबंधन बांधल्याने दक्षिणचा गड लढविण्यासाठी शिलेदारांच्या शोधात काँग्रेस होती. तो शिलेदार बाबा मिस्त्राrंच्या  रूपाने त्यांना सापडला आहे. एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला द†िक्षण सोलापूर विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार शोधण्याची पहिलीच वेळ काँग्रेसवर आली होती. ही वेळ बाबा मिस्त्राr यांनी बाजूला सारली आहे.

   शहरमध्य मधून मुस्लिम समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी द्यावी अशी मागणी होत होती. अखेर यावर तोडगा म्हणून माजी केंद्रीयगृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुस्लिम समाजाला खूश करण्यासाठी दक्षिण सोलापूमधून मुस्लिम चेहरा म्हणून नगरसेवक बाबा मिस्त्राr यांना जाहीर केली आहे. बाबा मिस्त्राr काँग्रेसचे नगरसेवक म्हणून काम करीत आहेत. सामाजिक, राजकीय क्षेत्रात त्यांचे कार्य पाहून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे.

Related posts: