|Sunday, March 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » ऑटोरिक्षात गांजा विकणाऱया दोघांना अटक

ऑटोरिक्षात गांजा विकणाऱया दोघांना अटक 

प्रतिनिधी/ बेळगाव

ऑटोरिक्षात गांजा विकणाऱया दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. रविवारी मार्केट पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्याजवळून 290 ग्रॅम गांजा व दोन कोयतेही जप्त करण्यात आले आहेत.

निकाब दस्तगीर पिरजादे (वय 38, रा. अशोकनगर), अशोक महादेवप्पा चुटकेन्नवर (वय 32, रा. मुन्नोळी, ता. सौंदत्ती) अशी त्यांची नावे आहेत. मार्केटचे एसीपी एन. व्ही. बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विजय मुरगुंडी, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बी. के. मिटगार, आसीर जमादार, मारुती चावडी, व्ही. बी. माळगी, वाय. एच. कोच्चरगी आदींनी ही कारवाई केली आहे.

रविवारपेठेतील कारंजीमठ कॉम्प्लेक्सजवळ केए 22 बी 6970 क्रमांकाच्या ऑटोरिक्षात गांजाविक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी निकाब व अशोक यांना अटक केली. या दोघा जणांवर अमली पदार्थ प्रतिबंधात्मक कायद्यांतर्गत मार्केट पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले.   

Related posts: