|Monday, February 24, 2020
You are here: Home » leadingnews » ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे निधन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

शोले, अंदाज अपना अपना, अशा तिनशेहून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते विजू खोटे यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 78 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. मुंबईतील गावदेवी येथे राहत्या घरी त्यांनी आज पहाटे त्यांनीअखेरचा श्वास घेतला.

मागील काही दिवसांपासून खोटे आजारी होते. काही दिवसांपूर्वीच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आपल्या अप्रतिम अभिनय कौशल्याने त्यांनी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजविले. नुकतेच 31 वर्ष पूर्ण झालेल्या बनवाबनवी या मराठी चित्रपटातही त्यांची भूमिका गाजली.

विजू खोटे यांनी 300 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि मालिकांमधून अभिनय केला आहे. त्यांच्या भूमिका छोटय़ा असल्या तरी देखील त्या गाजल्या. शोले चित्रपटातील गब्बर जेव्हा ‘तेरा क्मया होगा, कालिया?, असे विचारतो तेव्हा कालिया घाबरत, ‘स..स.. सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं, सरदार’ हा डायलॉग प्रचंड गाजला.

विजू खोटेंच्या जाण्याने एक हरहुन्नरी कलाकार हरवल्याची भावना चित्रपटसृष्टीतून व्यक्त होत आहे.

Related posts: