|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » कणकवलीतील दोघांना काँग्रेसकडून उमेदवारी

कणकवलीतील दोघांना काँग्रेसकडून उमेदवारी 

प्रतिनिधी / कणकवली:

तालुक्यातील भिरवंडे गावचे सुपूत्र असलेल्या विक्रम बाळासाहेब सावंत यांना जत मतदारसंघातून, तर नाटळ गावचे सुपूत्र असलेल्या डी. पी. सावंत यांना उत्तर नांदेड मतदारसंघातून काँग्रेसने उमेदवारी दिली आहे.

विक्रम सावंत हे भिरवंडे खलांतरवाडीचे मूळ रहिवासी. भिरवंडेकर सावंतांचे एक कुटुंब सात पिढय़ांपूर्वी सांगली येथील जत तालुक्यात स्थायिक झाले होते. आज तेथे सावंतांची सधन शेतकरी कुटुंबे आहेत. या कुटुंबांतील सर्व नातेवाईक दरवर्षी मूळ गावी देवदर्शनासाठी येत असतात. विक्रम सावंत यांचे कुटुंबिय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कै. पतंगराव कदम यांचे नातेवाईक आहेत. विक्रम सावंत हे भारतीय सहकारी बँकेचे वरिष्ठ अधिकारी आहेत. भारती विद्यापीठाचे संचालक आहेत. तेथील जि. प. सदस्य आहेत. विधानसभेच्या 2014 च्या निवडणुकीत विक्रम सावंत काँग्रेसकडून उभे राहिले होते. तेथे भाजप उमेदवार विजयी झाला होता. आता काँग्रेसने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.

डी. पी. सावंत यांचे कुटुंबीय नाटळ राजवाडी येथील आहे. त्यांचे वडील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्याशी जवळचे संबंध होते. गेले काही वर्षे हे कुटुंब नांदेड येथे स्थायिक आहे. 2009 व 2014 मध्ये नांदेड उत्तर मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर विजयी झाले. त्यांना पुन्हा काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे.

Related posts: