|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » 145 मतदान केंद्रांवर मोबाईल, दुरध्वनी सेवा नाही

145 मतदान केंद्रांवर मोबाईल, दुरध्वनी सेवा नाही 

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

विधानसभा निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ात 916 मतदान केंद्रे निश्चित  करण्यात आली आहेत. यामध्ये 145 केंद्रे दुर्गम भागात असून त्या ठिकाणी दुरध्वनी, मोबाईल किंवा फॅक्स कनेक्टीव्हीटी अशा कुठल्याही सुविधा नाहीत, अशी माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली.

जिल्हय़ात कणकवली, कुडाळ व सावंतवाडी हे तीन विधानसभा मतदारसंघ असून या तीनही मतदारसंघांची निवडणूक 21 ऑक्टोबरला होत आहे. या निवडणुकीसाठी 916 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी एकूण 915 मतदान केंद्रे होती. त्यात एका केंद्राची वाढ झाली.

जिल्हय़ातील एकूण मतदान केंद्रांची निश्चिती करताना सर्व केंद्रांची पाहणी करण्यात आली असून सर्वच्या सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आहेत. त्यामुळे जिना चढून कुणाल्याही वरच्या मजल्यावर मतदानासाठी जावे लागणार नाही. तसेच 659 ठिकाणी एकच मतदान केंद्र आहे. 113 ठिकाणी दोन-दोन मतदान केंद्रे आहेत. नऊ ठिकाणी तीन-तीन मतदान केंद्रे आहेत. तर एका इमारतीत पाच मतदान केंद्रे आहेत.

823 मतदान केंद्रे ही ग्रामीण भागात, तर 93 मतदान केंद्रे शहरी भागात आहेत. 145 मतदान केंद्रे अशी आहेत की त्या ठिकाणी मोबाईल, दुरध्वनी किंवा फॅक्स कनेक्टीव्हीटी नाही. 179 मतदान केंद्रांवर इंटरनेट छाया क्षेत्रातील मतदान केंद्रे आहेत. 92 मतदान केंद्रावर वेबकास्ट केले जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

Related posts: