|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » ठरलं ! उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील रिंगणात

ठरलं ! उदयनराजेंविरोधात राष्ट्रवादीकडून श्रीनिवास पाटील रिंगणात 

श्रीनिवास पाटील गुरुवारी करणार उमेदवारी अर्ज दाखल

ऑनलाईन टीम / सातारा :

सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूकीत भाजपचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात राष्ट्रवादीकडून सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या नावावर आज सकाळी शिक्कामोर्तब करण्यात आले.

मागील काही दिवसांपासून उदयनराजेंविरोधात कोणाला उमेदवारी द्यायची यावर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनेक नावे चर्चेत आली होती. मात्र, अखेरच्या टप्प्यात काँग्रसचे पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्ऱवादीचे श्रीनिवास पाटील यांचे नाव फायनल यादीत आले. पृथ्वीराज चव्हाण यांनी कार्यकर्त्यांच्या मतानुसार कराड दक्षिणमधून विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आज श्रीनिवास पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

श्रीनिवास पाटील येत्या गुरुवारी (दि. 3) आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाटील यांच्या नावावर आज शिक्कामोर्तब केले.

Related posts: