|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » नाटय़ संमेलनाध्यक्षपदासाठी चुरस : जब्बार पटेल, मोहन जोशी यांची नावे आघाडीवर

नाटय़ संमेलनाध्यक्षपदासाठी चुरस : जब्बार पटेल, मोहन जोशी यांची नावे आघाडीवर 

पुणे /  प्रतिनिधी : 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचा अध्यक्ष कोण होणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. शाखांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या छाननीमधून दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल आणि ज्ये÷ अभिनेते व नाटय़ परिषद मुंबईचे माजी अध्यक्ष मोहन जोशी अशी दोन नावे वैध ठरली आहेत. या दोघांपैकी कुणाच्या गळय़ात संमेलनाध्यक्षपदाची माळ पडणार? हा आता औत्सुक्मयाचा विषय ठरणार आहे.

अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषदेच्या घटनेनुसार संमेलनाध्यक्षपदाची निवड ही बिनविरोध पद्धतीने केली जाते. त्यासाठी परिषदेच्या विविध शाखांकडून संमेलनाध्यक्षपदासाठी अर्ज मागविले जातात. नाटय़ परिषदेच्या विविध शाखांसह वैयक्तिक स्तरावर संमेलनाध्यक्षपदासाठी 30 सप्टेंबर अर्ज मागविण्यात आले होते. त्यानुसार सोमवारी प्राप्त झालेल्या अर्जांमधून डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांचे अर्ज वैध ठरले. नाटय़ परिषदेच्या पुणे आणि कोथरूड शाखेकडून मोहन जोशी  तर नाटय़ परिषद मुंबईकडून डॉ. जब्बार पटेल यांचे नाव सुचविण्यात आले असल्याचे कळते.

मोहन जोशी यांनी नाटय़ परिषद मुंबईचे अध्यक्षपद भूषविले आहे. दोन्हीही नाटय़ क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व असली, तरी जोशी यांच्या तुलनेत डॉ. जब्बार पटेल यांचे पारडे जड राहण्याची शक्मयता अधिक आहे. कारण मध्यवर्ती शाखेकडून डॉ. पटेल यांच्याच नावाला अधिक पसंती आहे. नाटय़ परिषदेच्या नियामक मंडळाच्या कार्यकारिणीसमोर ही दोन ठेवली जातील आणि त्यातील एका नावाची एकमताने निवड करण्यात येईल.

बैठकीबाबत निश्चिती नाही !

याबाबत अध्यक्ष अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद मुंबई शाखेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी म्हणाले, शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी डॉ. जब्बार पटेल आणि मोहन जोशी यांची नावे वैध ठरली आहेत. नियामक मंडळाच्या कार्यकारिणी बैठकीत ही दोन नावे ठेवली जातील. मात्र बैठक कधी घेण्यात येईल, हे अद्याप ठरलेले नाही.

Related posts: